पशुसंवर्धन विभागातर्फे योजनांसाठी अर्ज करा

। तळा । वार्ताहर ।
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी यासर्वांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाने योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे व लाभार्थी व निवड करण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे. त्या नुसार नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, मांसल कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी व निवाराशेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, कुकुट व पिलांचे वाटप व तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी वनवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहेत याची व निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी पशुपालक /शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व विभागा मार्फत करण्यात येत आहे.

Exit mobile version