। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्षपदी अभिजित चांदोरकर व संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी साक्षी दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नियुक्त केलेल्या तालुक्यातील विविध शासकीय समित्यांच्या पदाधिकार्यांची नियुक्ती पत्रे वितरण कार्यक्रम पाली तहसील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावर यांच्या हस्ते अभिजित चांदोरकर, साक्षी दिघे व समितीमधील सदस्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आली आहेत. यावेळी रमेश साळुंखे, यशवंत माने, राजेश कानडे, सुधीर केदारी, सुधीर भालेराव, सुलतान बेनसेकर, प्रकाश आवास्कर, सागर मिसाळ, किरण खंडागळे, संतोष बोडेकर, दिपक पवार, श्री. बेलोसे, हर्षद पालवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







