। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश यशवंत धामणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील उपसरपंच यांचा निर्धारित कार्यकाल पुर्ण झाल्याने त्या रिक्त झालेल्या जागेवर योगेश धामणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अलका बामुगडे यांनी काम पाहिले असून सरपंच कांचन मोहिते, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव, वसंत मरवडे, भाई पोटफोडे, भाऊ पोटफोडे, नितिन जाधव, महेश शिर्के, सागर मोरे, सचिन महाडिक आदींसह सर्व सदस्य व खांब, नडवली, वैजनाथ, घेरासूरगड आदी गावातील ग्रामस्थ व तरूणवर्ग उपस्थित होते.