। सावंतवाडी । प्रतिनिधी ।
सावंतवाडी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी संजय कातिवले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी रविवारी (दि. 20) पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्यात 2013 ते 2021 या कालावधीत उपनिरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली. त्यांनी देवगड पोलिस ठाण्यात 2019 ते 2021 या कालावधीत सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची बदली झाल्याने त्यांनी पालघर रेल्वे पोलिसांत सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी काम पाहिले. तेथून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कणकवली व ओरोस येथे पोलीस विभागाचे पेट्रोल पंप व्हावेत, यासाठी वरिष्ठ पातळीवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले होते.
सहायक पोलीस निरीक्षकपदी कातिवले
