। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
कुणबी समजोन्नोती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शंकरराव म्हसकर, सुरेश मगर यांच्या प्रमूख उपस्थीत माजी आमदार स्व. पा.रा.सनाप कुणबी भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत तालुका पातळीवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असुन रोहा तालुका कुणबी समाजाच्या अध्यक्षपदी नव्याने रामचंद्र सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. तर, सरचिटणीसपदी सतीश भगत यांच्यासह उपाध्यक्षपदी मारूती खांडेकर, अनंत थिटे, राजेंद्र शिंदे, रघुनाथ करंजे, गुणाजी पोटफोडे, संतोष खेरटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी शिवराम शिंदे, शंकरराव म्हसकर, सुरेश मगर, शंकर भगत, रामचंद्र सपकाळ, अमित मोहिते, महेश बामुगडे, दत्ताराम झोलगे, निवास खरीवले, खेळु ढमाल, पांडुरंग कडू, दिलिप आवाद, नरेंद्र सकपाळ, गिजे भाऊसाहेब, सुहास खरिवले, मोरेश्वर खरीवले, मुरलीधर ठमके, बाबुराव बामणे, रामचंद्र चितळकर, गणेश खरीवले, केशव भोकटे, यशवंत मुंढे, प्रकाश शिंदे, विजय पवार, ज्ञानेश्वर दळवी, परशुराम भगत, राम तेलंगे, भाई बामुगडे आदी उपस्थीत होते.