| पेण | वार्ताहार |
रोडेचे माजी सरपंच स्वप्निल मारूती म्हात्रे यांची रायगड शेतकरी योध्दा कुक्कुटपालन सहकारी संस्थेमार्फत पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या पेण तालुका प्रमुख पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हयाचे संचालक मंडळ तसेच जिल्हा प्रमुख अनिल खामकर तसेच तालुक्यातील शेकडो पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.
स्वप्निल म्हात्रे हे त्यांच्या अभ्यासू व आक्रमक स्वभाव शैलीसाठी तालुक्यात प्रसिध्द आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या लाल ब्रिगेट संघटनेचे तालुका अध्यक्ष असून न्याय हक्कासाठी वेळेवर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार्यातले असल्याने त्यांचा फायदा संघटनेला नक्कीच होईल. तसेच उपतालुका प्रमुख म्हणून अजिंक्य पाटील, उपतालुका अध्यक्ष प्रकाश पाटील (पेण पुर्व विभाग प्रमुख), अनिल पवार (पेण पुर्व उपविभाग प्रमुख), भास्कर म्हात्रे (वडखळ नागोठणे विभाग प्रमुख), काशिनाथ म्हात्रे (वडखळ नागोठणे उपविभाग प्रमुख), समाधान घरत (जिते विभाग प्रमुख), दिलीप पाटील (हमरापुर विभाग प्रमुख), मधू घरत (हमरापुर उपविभाग प्रमुख), गणेश म्हात्रे (हमरापुर विभाग), निलेश ठाकुर (वाशी विभाग प्रमुख) यांची नियुक्ती झाली आहे.