दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने (दि.14) मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.

ज्ञानेश कुमार हे केरळमधील, तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि एनएचएआयचे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार 1988 बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते गृहमंत्रालयात होते. कलम 370 संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात होते. आता या नावांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतली. त्यानंतर अधिसूचना काढण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version