। हमरापूर । प्रतिनिधी ।
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पेण तालुका युवा सेना अधिकारीपदी पाटणेश्वर येथील योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे व वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार युवासेना पेण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेनेचे कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव, महाराष्ट्र विस्तारक सुधीर ढाणे, जिल्हा युवा सेना अधिकारी अमीर मधुकर ठाकूर, उपजिल्हा अधिकारी प्रवीण पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
योगेश पाटील यांची नियुक्ती
