| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच मनीषा दळवी यांची शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या कर्जत तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तर कर्जत शहर मदत कक्ष प्रमुख म्हणून मुद्र भागातील कार्यकर्ते उदय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. संतोष भोईर, भाई गायकर, रेखा ठाकरे, संभाजी जगताप,पंकज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.