| पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यात सर्वत्र क्रिकेट सामन्यांचे सत्र सुरू झाले आहे. क्रिकेटपट्टू, क्रिकेटप्रेमी यांच्यासाठी प्रत्येक तालुक्यात नाईट अंडरआर्म, ओव्हरआर्मचे सामने विविध क्रिकेट क्लब, मंडळं, प्रतिष्ठान, तसेच राजकीय पुढार्यांकडून क्रिकेटपट्टूसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांसाठी लाखोंची बक्षिसे लावण्यात येतात. यामधून उत्कृष्ट खेळपट्टूचे मनोधैर्य वाढवले जात असून एक चांगला खेळाडू या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून तयार होत आहे.
विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लबने 13 व्या वर्षात पदार्पण केले असून क्रिकेट सामन्यांच्या निमित्त विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब ने सन 2011 पासूनच्या प्राथमिक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा पेण सुधागड रोहाचे माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इयत्ता 10वी,12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास पेण सुधागड रोहाचे माजी आ. धैर्यशील पाटील यांनी उपस्थितीत दर्शविली. संजय सागळे व रमेश सागळे हे उदघाटक होते. यावेळी विठ्ठल घाडगे, दिपक पवार, गणपत सितापराव, अतिष सागळे, सतीश देशमुख, उद्धव गुंजाळ, दशरथ मांढरे, विकी भऊड, सचिन सागळे, विश्वास वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश शेडगे यांनी केले.