| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे सरकार गतिमान आहे. कामगार आणि ग्रामस्थांसाठी विविध विकास कामे करण्यात येत आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात येत असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार आणि ग्रामपंचायती मधील गेली अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे, समस्या मार्गी लावण्यबाबत आज महाड उत्पादक संघाच्या सीईटीपीमधील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कारखानदार, उद्योजक यांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येत आहेत, विविध प्रश्नांबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत असे ते सामंत म्हणाले. एमआयडीसीच्या राज्यभरातील 347 कर्मचाऱ्यांपैकी 316 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे, उर्वरित 31 कर्मचाऱ्यांना कायम सेवेतील कर्मचार्ऱ्यां प्रमाणेच पॅकेज दिले जाईल. वाढीव एमआयडीसीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना या क्षेत्रात प्रदुषण कंपन्या न आणता ग्रीन झोनमधील कारखाने आणले जातील आणि 20 टक्के जागा लघु उद्योजकांसाठी ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर महाडचे आमदार भरत गोगावले, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, मनोज काळीजकर, संजय कचरे, प्रांताधिकारी डॉ. बानापुरे, डिवायएसपी शंकर काळे, संपर्क प्रमुख विजय सावंत,तालुका प्रमुख सुरेश महाडीक, सिईटीपीचे अध्यक्ष अशोक तलाठी, कारखान्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.