नवीन ग्रंथालयांना मान्यता द्या

जिल्हा ग्रंथालयाची मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या आदेशाने रायगड जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उच्च व तंत्रशिक्षणमंत्री महाराष्ट्र शासन यांना उर्वरित 40% अनुदान वाढ, दर्जा वाढ व नवीन ग्रंथालयांना मान्यता विधानसभा निवडणूक आचारसहिंतेपूर्वी लागू करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के साहेब यांनी करून त्यांनी याबबाबत तात्काळ महाराष्ट्र शासनास पुढील कार्यवाहीसाठी पाठवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

याप्रसंगी रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजयजी बोंदार्डे, जिल्हा ग्रंथालय संघाचे जेष्ठ माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक नागेशजी कुळकर्णी, ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष भालचंद्र वर्तक, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे सह कार्यवाह अभिजीत चौधरी, आदी उपस्थित होते.

Exit mobile version