आंबेत घाटात ठेकेदाराचा मनमानी कारभार

| आंबेत | वार्ताहर |
सध्या सर्वत्र बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अंतर्गत कामांची धूम सुरू असून ही कामे पावसाळ्याआधी  पूर्णत्वास नेण्याची सर्वच ठेकेदारांची धावपळ होताना दिसते, मात्र आंबेत नांदवी घाटात आयजी देवस्थान शेजारी सुरू असलेल्या मोर्यांच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून हलगर्जी पणा होत असल्याची बाब समोर आली आहे.या ठेकेदाराने चक्क धोकादायक वळणावर अपघात प्रवण क्षेत्रात बांधण्यात आलेल्या मोर्यांच्या विरुद्ध बाजूलाच खोदकाम केल्याने कोणत्याही क्षणी या मोर्यांच्या भाग कोसळण्याची दाट शक्यता नाकारता येतं नाही अशी शंका स्थानिक नागरिक तसेच प्रवाशी वर्गाकडून होताना दिसते. उलटपक्षी संबंधित अधिकारी देखील या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याच चित्र समोर येत आहे.
   

आंबेत घाट हा अतिशय तीव्र वळणाचा असून या घाट क्षेत्रात काही धोकादायक वळणावर या आधी कित्येक अपघात झाल्याची नोंद आहे यामुळेच आशा अपघातग्रस्त वळणांवर सुरक्षित कठडे बांधणे आवश्यक असल्याने हे काम करण्यात येत आहे मात्र ठेकेदाराचा याच अपघात क्षेत्राला पुन्हा नव्याने अपघातमय बनवण्याचा तूर्तास डाव सुरू असल्याचं या कामगिरी वरून दिसत आहे,
 

Exit mobile version