| आंबेत | वार्ताहर |
आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण होऊन गेले, तरी अद्याप पूर्ण सोयीसुविधांची उपलब्धता सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे उर्वरित उपचाराकरिता नागरिकांना खासगी दवाखाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. हीच बाब लक्षात घेता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरत उर्वरित सोयी सुविधांची विचारणा केली. यासोबतच पाण्याची समस्या, दवाखान्यावरील पत्रा शेड, आंबेत येथील सावित्री पुलावर विद्युत पुरवठा याचा पाठ पुरावा संबंधित विभागाकडून घेत लवकरच प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आरोग्य विभाग अधिकारी, पोलीस प्रशासन, समीर बनकर, नाना सावंत, नाविद भाईजान, संजय कर्णिक, निकेश कोकचा, संतोष सावंत उपस्थित होते.