…म्हणूनच संस्थेविरोधात उरणकर बिथरले


पालक शिक्षक संघटनेचा न्यायालयात जाण्याचा इशारा
। चिरनेर । वार्ताहर ।
उरण एज्युकेशन संस्थेने आकारलेली फी तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा संस्थेच्या विरोधात सनदशील मार्गाने न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा उरण मधिल पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रविण पुरो यांनी संघटनेच्या वतीने उरण येथील हॉटेल शामियाना येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

राज्यात कोरोना संकटाने मार्च 2020 पासून हाहा:कार माजवल्यामुळे राज्यातील सारी व्यवस्था कोलमडून पडली आहे. या स्थितीत आपला प्रत्येक दिवस कसा ढकलावा, अशा विवंचनेत असलेल्या राज्यातील जनतेला विविध स्तरांवर सवलती आणि योजना जाहीर केल्याचे आपण पाहतोच आहोत. रोजच्या जीवनाचा भाग बनलेल्या आपल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यानंतर जवळपास सगळ्याच शाळांमधील तात्पुरत्या भरलेल्या शिक्षकांना घरी बसवण्यात आले आहे. यामुळे या शिक्षकांना द्यायचे वेतन हे शाळांकडे जमा होऊ लागले. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने शाळांना लागणारी वीज, पाणी व तत्सम खर्च यात प्रचंड बचत झाली आहे.

दरम्यान 15 टक्के इतक्या फीवाढीचा प्रस्ताव परस्पर गृहित धरत संस्थेने 1 ली, 5 वी, 8 वी, 12 वीचे प्रवेश जाहीर करत या प्रवेशासाठी वरील रक्कम भरण्याची सक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधीन शाळेची फी 15 टक्के इतकी कमी करणे आणि सरकारच्या शासननिर्णयानुसार शिक्षणेतर फी न आकारल्यास विद्यार्थ्यांना विद्यमान फीमध्ये सरसकट 32 टक्के इतकी सवलत मिळणे क्रमप्राप्त आहे. हे लक्षात घेऊन उरण एज्युकेशन संस्थेने आकारलेली फी तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा संस्थेच्या निर्णयाविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन छेडावे लागेल अशी ताकिद पालक शिक्षक संघटनतर्फे देण्यात आली आहे.

Exit mobile version