सांगलीत तीन नगरसेवक निवडून आले; राज्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये शेकापचे वर्चस्व
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील काटोल नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने मोठा राजकीय धक्का देत थेट नगराध्यक्षपदावर लाल बावटा फडकवला आहे. तसेच बारा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस राहुल देशमुख यांच्या पत्नी अर्चना देशमुख नगराध्यक्ष म्हणून बहुमतांनी निवडून आल्या आहेत. तसेच सांगली नगरपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे तीन नगरसेवकपदाचे उमेदवारांनी बाजी मारली आहे. रमेश जाधव, दिव्यानी दौंडे, श्रद्धा साबळे अशी नगरसेवकांची नावे आहेत. रायगडसह अन्य जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. तळागाळापर्यंत काम करणाऱ्या तसेच गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला मतदारांनी पसंती दर्शविली असल्याचे दिसून आले आहे.







