क्रिकेट खेळताना बाचाबाची; दोघे जखमी

श्रीवर्धन | वार्ताहर |
वालवटी येथे क्रिकेट खेळताना झालेल्या बाचाबाचीला गंभीर स्वरूप आले.तौफिक उमर जिवरक व बिलाल ईस्माईल जिवरक हे युवक क्रिकेट खेळत असता ना बाचाबाची व शिवीगाळ झाली.फिर्यादीचे भाऊ तज्जमुल यांनी आरोपीस घरी जाण्यास सांगितले.या गोष्टीचा मनात राग ठेऊन आरोपीने फिर्यादीच्या भावाच्या मोटारसायकल वर कोयत्याने वार करून मोटारसायकल चे नुकसान केले. तसेच फिर्यादी व भावाला कोयत्याने मारून दुखापत केली.तोच राग मनात ठेवून फिर्यादीच्या घरासमोर हातात सुरा घेऊन फिर्यादीच्या भावाला मारले व डाव्या हाताला चावा घेऊन पळून जात असतांना तुम्हाला बघून घेईन.अशी धमकी दिली.
फिर्यादी तौफिक उमर जिवरक ह्यांनी केलेल्या तक्रारीनुसार बिलाल ईस्माईल जिवरक ह्याच्यावर श्रीवर्धन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश मान यांनी पुढील कारवाई केली.

Exit mobile version