| पनवेल | वार्ताहर |
रेल्वे प्रवासादरम्यान दोन गटांमधील वादातून दोन महिलांच्या मनास लज्जा निर्माण होणारे कृत्य केल्या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कणकवली रेल्वे स्टेशन येथे मडगाव- एलटीटी एक्स्प्रेस ट्रेन नंबर 11100 मधील बोगी नं. एस 8 मधून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी हे अंताक्षरी खेळत असल्याने एका कुटुंबास त्याचा त्रास होत असल्याने त्यांनी सदर विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये गोंधळ न घालण्याबाबत सांगितले. त्यावेळी त्यांचे आपापसामध्ये वादविवाद होऊन विद्यार्थ्यांनी सदर कुटुंबास शिवीगाळ व दमदाटी केली. सदर इसमाने टीसींकडे तक्रार केल्याने टीसी यांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांनी सदर कुटुंबाची माफी मागितली. त्यानंतर टीसीने विद्यार्थ्यांना दुसऱ्या डब्यात शिफ्ट केले. तरी देखील त्या कुटुंबातील इसम सदर विद्यार्थ्यांशी वाद घालत होता. त्यास एक अपंग शिक्षक व विद्यार्थिनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना सदर इसमाने विद्यार्थीनीच्या अंगावर धावून जाऊन मनास लज्जा निर्माण होणारे कृत्य केले.
सदर वादविवाद बाबत त्या कुटूंबातील प्रवाशाने रेल्वे हेल्पलाइन नंबर, रेल्वे मंत्रालय, रेल्वेमंत्री, गृहमंत्री म.रा. यांना ट्विटर द्वारे तक्रार दिली. सदरची ट्रेन पनवेल रेल्वे स्टेशन येथे आली असता आरपीएफ चे स्टाफने सदर प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यांचे घटनास्थळ कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील असल्याने सदरचे गुन्हे कणकवली पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले आहेत.