पर्यटनासाठी आलेल्या ग्रुपमध्ये वाद

| पुणे | प्रतिनिधी |

लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे त्यातील एका पर्यटकाने रागाच्या भरात डोंगर माथ्यावरून थेट खंडाळ्यातील राजमाची पॉईंट येथील खोल दरीत धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. सुदैवाने राजमाची पॉईंट खालून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळू नये यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीचा आधार त्याला मिळाला. यामुळे तो सुखरूप खाली रस्त्यापर्यंत उतरू शकला.

संबंधित पर्यटकाला खंडाळा बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला समज देऊन सोडून दिले. या घटनेत संबंधित पर्यटक सुखरूप असला तरीही त्याचा हा जीवघेणा प्रयत्न त्याच्या जीवांवर बेतू शकला असता. तसेच त्यामुळे इतर सोबतची मंडळी ही अडचणीत येण्याची शक्यता होती.

Exit mobile version