। राजापूर । वृत्तसंस्था ।
रविवार पासून संततधार पडणार्या पावसामुळे राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.
अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा देत शिवस्मारकार्पर्यत धडक मारली असून शहर बाजारपेठेत पाणी शिरले आहे. जवाहर चौक, बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर पाण्याखाली गेला असून राजापूर चिखलगाव रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरिल वाहतुक बंद करण्यात आली आहे.ग्रामीण भागातही पावसाचा जोर असून नदी नाले भरून वाहू लागले आहेत. राजापूर ओणी पाचल मार्गावर सौंदळ रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरिल वाहतुक ठप्प झाली आहे.