अरमान सय्यद याचा नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते सत्कार

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
अलिबाग शहरातील रहिवासी अरमान शहनवाज सैय्यद ह्याने काशीद येथील पुलदुर्घटनेत समयसूचकता दाखवत अपघातग्रस्त वाहनांतील लोकांचे जीव वाचवण्यासाठी केलेल्या धाडसाबद्दल नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अजय झुंजारराव, नगरसेवक वृषाली ठोसर, सुरक्षा शाह, ॲड. गौतम पाटील, अनिल चोपडा, महेश शिंदे, तसेच ईरशाद सय्यद, नवाब पल्लवकर, शाहनवाज सैय्यद मुसद्दीक सैय्यद, मन्सूर सय्यद आदी उपस्थित होते.

Exit mobile version