। रसायनी । वार्ताहर ।
कोरोना काळात आपल्या रुग्णालयाद्वारे अविरत व उत्कृष्ट सेवा देणार्या हॉस्पिटलचा व पॅरामेडिक स्टाफचा सत्कार सोहळा रायगड मेडिकल असोसिएशन व इन मेजर सिटी फाउंडेशन नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जुलै 2022 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉ.पाटील हॉस्पिटल रसायनीचे डायरेक्टर डॉ.जितेंद्र रामचंद्र पाटील व डॉ.सौ अनघा जितेंद्र पाटील व त्यांच्या संपूर्ण हॉस्पिटल टीमला पदमश्री डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर व खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थितीत आरोग्यम् धनसंपदा 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यासाठी रायगड मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. राजेश शिंदे, इन मेजर सिटी फाउंडेशनचे सुनील कुमार प्रभाकरन, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ.सोमनाथ गोसावी,नवी मुंबई होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रतिक तांबे तसेच निमा संघटनेचे अध्यक्ष व नवी मुंबई इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच रायगड जिल्ह्याच्या विविध भागातील अनेक नामांकित हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते.