। पाली । वार्ताहर ।
जपान कराटे असोसिएशन इंडियाच्यावतीने विभागीय स्तरावर कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा सातार्यातील छत्रपती शिवाजी महाराज शाहू स्टेडियम येथे नुकतीच घेण्यात आली. या विभागीय स्पर्धेत माणगाव तालुक्यातील विळे या छोट्या गावातील आरोही दीपक सोनवणे या इयत्ता पाचवीत शिकणार्या मुलीने रायगड जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आरोही दीपक सोनवणे हि कुंडलिका प्री-प्रायमरी इंग्लिश स्कुल विळे येथे शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अतिशय लहान वयात कराटे स्पर्धेत आरोहीने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. तिला मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कराटे स्पर्धेत रायगड, सातारा, नांदेड, पुणे, कराड, धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत यश मिळाल्याने आरोहीचा आत्मविश्वास वाढला आहे.






