पालीतील मोकाट गुरांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन

। पाली/वाघोशी । वार्ताहर ।

पाली बाजारपेठ तसेच वसाहतीमध्ये मोकाट गुरांचा वावर वाढला असून याबाबत पालीतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाली बाजारपेठेतील गांधी चौक, हटाळेश्‍वर चौक, बाजारपेठ तसेच वसाहती मधील सोसायट्यांमध्ये ठिय्या मांडत असतात. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रात्रीच्या वेळेला ही गुरे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे अपघात होतात. तसेच सोसायटीमध्ये ठिय्या केल्याने प्रचंड घाण होते. गुरांची जर झोंबी झाली तर त्यामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

एखाद्या गाईने जर वासराला जन्म दिला तर फिरणारे भटके कुत्रे त्या जनावरांचे लचके तोडतात. यात कधीकधी वासराचा मृत्यू देखील होतो. या सर्व मोकाट गुरांचा पाली नगरपंचायतीने बंदोबस्त करावा. असे आवाहन न्याय हक्क ग्रुप सुधागडचे प्रमुख मंगेश पालांडे यांनी केले जर नगरपंचायतीला या मोकाट गुरांचा बंदोबस्त करता येत नसेल तर ती गुरे आमच्या हवाली करावी. आम्ही त्यांना गोशाळा अथवा इतर शेतकर्‍यांकडे सांभाळायला देऊ. त्यामुळे पालीकरांच्या होणारा त्रास कमी होऊ शकतो. असे न झाल्यास न्याय हक्क ग्रुप सुधागडच्या वतीने जना आंदोलन छेडण्यात येईल असे देखील ते पुढे म्हणाले. यावेळेस विजय धनोदरे, सुधीर सावंत, शिवराम पवार, राकेश साजेकर, नंदू कुडापणे, रवी खंडागळे, सिताराम भोईर, मनोज शिंदे, किशोर बुरूमकर अदि सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version