| उरण | प्रतिनिधी |
शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबविण्यात आली. सध्या उन्ह्याचे दिवस आहेत, पक्षांना व मुक्या प्राण्यांना सध्या पाणी व खाऊची गरज आहे. याच गोष्टीचे भान ठेऊन शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना करंजाडे मध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. या कार्यक्रमाला शिव प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, राकेश कुसळे, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे, तुषार कदम, योगेश कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिव प्रतिष्ठानच्या वतीने निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पक्षांसाठी व पाळीव प्राण्यांसाठी असा संकल्पना राबविला पाहिजे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. निसर्ग व सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेत असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून सदर संस्थेने सर्वांना दिला आहे. शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूठभर धान्य व घोटभर पाणी या उपक्रमामुळे मुक्या प्राण्यांना पाणी व अन्न, खाद्य उपलब्ध होणार आहे, त्यामुळे उन्हाळामध्ये मुक्या पशु पक्षी प्राण्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. सदरच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
मुक्या प्राण्यांसाठी खाद्याची व्यवस्था
