गोयंकाला अटक करा; ट्विंकल’च्या ठेवीदारांची सरकारकडे मागणी

आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने आंदोलन; रायगडसह राज्यभरातील ठेवीदारांना वीस हजार कोटींचा चुना

। रसायनी । वार्ताहर ।

ट्विंकलच्या ठेवीदारांचे सुमारे 20 हजार 198 कोटी रुपये घेऊन दुबईत पळालेल्या ओमप्रकाश गोयंका याला ताबडतोब अटक करा, आमचे पैसे परत मिळवून द्या, अशी जोरदार मागणी करण्यासाठी रायगड, पुणे, मुंबईतील ठेवीदार आझाद मैदानात एकत्र आले होते. या आंदोलनात राज्यभरातील शेकडो गुंतवणुकदारांनी सहभाग घेतला.

सरकार, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू असल्याचे मीरा ड्रिंकल सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री गाडगीळ यांनी सांगितले. या आंदोलनात केतकी महाजन, संदीप शहा, भाऊ पवार, रोहिदास रानवडे, विशाल पाटील, राम दयाळकर, मनक्रणाम जोशी, सारीका गुथडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ओमप्रकाश लाल गोयंका याने 1986 साली मिराह ग्रुप व ड्रिंकल ग्रुपच्या अंतर्गत विविध कंपन्या स्थापन करून टाईम हॉलिडे प्लॅनच्या (हॉटेल सुविधा व न ठराविक रकमेचा परतावा देणे) माध्यमातून लाख ठेवीदारांना सभासदत्व दिले.

मल्टिलेवल मार्केटिंग एजंटमार्फत 20 हजार 198 कोटी रुपये गोळा करून देश विदेशातील इंटिल्स, रेस्टॉरंट, रियल इस्टेट 300 ते 400 अवैध शेल कंपन्यामध्ये मनी लॉन्ग करून गोयंका याने स्वतःच्या व कुटुंबाच्या नावावर देश-विदेशात मालमता घेतल्या, असे जयश्री गाडगीळ यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, आम्ही घरकाम करणारे लोक, तुटपुंज्या पगारावरती नोकरी करून महिन्याच्या महिन्याला आम्ही या ट्विंकलमध्ये पैसे भरत होतो. पण, आम्हाला याचा काहीही फायदा झाला नाही. आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. माझा नवरा मार्केटमध्ये जरी गेला तरी त्याच्या अंगावरती लोक धावून येतात, त्यांना मारहाण करतात आणि त्यांनी गळफासही लावून घेण्याचा दोन वेळा प्रयत्न केला, असा प्रकार आमच्या सोबत होत आहे. तर काहींनी सांगितले की, माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली थोडीशी तुटपुंजी रक्कम माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती, तर संसारासाठी ठेवलेला एकही पैसा कामी आला नाही. या कंपनीने मात्र आमच्या संसाराचे वाटोळे केले, आम्हाला उघड्यावर टाकले, असेही सांगण्यात आले. लवकरात लवकर परमेश्‍वराने आमचे पैसे मिळवून द्यावे आणि आमच्या संसार हा सुरळीत चालावा यासाठी आम्ही या भगवंताला साकडेसुद्धा घालत आहोत.

आमच्यावर झालेली मारहाण पाहता पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो असलो, तरी पोलीस स्टेशनचे अधिकारी सांगतात की आम्हाला सांगून तुम्ही पैसा टाकला नव्हता, तर आम्हाला याविषयी काही सांगायचं नाही, अशीही उडवाउडवीची उत्तरे आम्हाला या पोलीस शासनामार्फत या ठिकाणी मिळत असतात, असे गुंतवणूकदार यांनी सांगितले. याप्रकरणी राज्य शासन कोणत्या प्रकारची दखल घेणार व ट्विंकल ग्रुप यांचे सर्वेसर्वा गोयांक कुटुंबीय तसेच कंपनीचे उच्च अधिकारी यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार हे पाहणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार हे या प्रकरणाला नक्कीच वाचा फोडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे पैसे त्यांना मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आंदोलकांनी सांगितले.

Exit mobile version