भाड्याच्या गाड्या गहाण ठेवणाऱ्याला अटक

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत पोलिस ठाणे हद्दीमधील गौरकामत येथून तरुण हा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करायचा. नंतर त्या भाड्याने घेतलेल्या गाड्या संबंधित तरुण हा विक्री करून बक्कळ पैसे कमवायचा. त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्याची उकल लागण्याची शक्यता आहे.

भिसेगाव भागातील शिवनाथ विश्वनाथ कारखेले यांची मारुती इर्टीका गाडी 14 ऑक्टोबर 2022 रोजी भाडेकरार करून सदरच्या तरुणाने घेतली होती. हा तरुण गाडी मालक कारखेले यांना वर्षा काठी 4 लाख 80 हजार रुपये देणार होता, मात्र मगील काही महिने भाड्याची रक्कम सदरचा तरुण पोहचवत नव्हता. त्यामुळे कारखेले यांनी कर्जत पोलिस ठाणे गाठून आपल्या गाडी बद्दल तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला गौरकामत येथून ताब्यात घेतले असता धक्कादायक माहिती समोर आली. कारखेले यांची इर्टीका गाडी ही त्या तरुणाने गाडीच्या कागदपत्रांच्या आधारे अन्य व्यक्तीकडे गहाण म्हणून ठेवली होती. गाडीची परस्पर गहाण ठेवून विक्री करण्यात आल्याने कर्जत पोलिसांनी गाडीचा शोध घेतला आणि गाडी गहाण ठेवलेल्या व्यक्तीकडून कर्जत पोलिस ठाण्यात आणली. आरोपीने अन्य किती जणांची अशी फसवणूक केली आहे. याचा पोलिस तपास करत आहेत.

Exit mobile version