अल्पवयीन मुलीसोबत अश्‍लील चाळे करणार्‍याला अटक

। नेरळ । प्रतिनिधी ।

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यासोबत अश्‍लील चाळे केल्याची घटना कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या नेवाळी गावात घडली. आरोपीने मुलीच्या कुटूंबियांना दिलेले उसने पैसे मागण्याच्या उद्देशाने फिर्यांदीच्या घरात प्रवेश केला होता.

याबाबत नेरळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, नेवाळी येथील फिर्यादी महिलेच्या घरात 12 वर्षांची मुलगी वगळता कोणीही नव्हते. त्याचा फायदा घेऊन दिलेले उसने पैसे मागण्याच्या उद्देशात घरात घुसून नराधमाने पीडित मुलीसोबत अश्‍लील कृत्य केले. याप्रकरणी आरोपीविरोधात नेरळ पोलीस ठाण्यातपीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे करीत आहेत.

Exit mobile version