| पनवेल | वार्ताहर |
विदेशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली (पुर्व) यांनी केली अटक करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत टाटा नाका परिसर येथे एक इसम बेकायरेदशीर रित्या विनापरवाना पिस्टल सोबत बाळगुन फिरत असल्याबाबत माहिती खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याप्रमाणे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळया टिम तयार करण्यांत येवुन गुन्हयांतील आरोपीतास पकडण्याकरीता सापळा लावण्यात आला. गुप्त बातमीदार तसेच आरोपीताचे वर्णना नुसार आरोपीताचा शोध घेवून आरोपीत राम उर्फ शिवा फुलचंद कनोजीया यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडुन एक विदेशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा एकुण 2,00,400 रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीत याचे विरूध्द मानपाडा, डोंबिवली, पनवेल शहर, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे यापुर्वी 06 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, सचिन गुंजाळ, सुनिल कुराडे, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, राम चोपडे, दत्तात्रय गुंड, संपत फडोळ, महेश राळेभात, प्रशांत आंधळे, भानुदास काटकर, राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, दिपक गडगे, गणेश भोईर, प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे, शांताराम कसबे, रवि हासे, अशोक आहेर, विजय आव्हाड, महेद्र मंझा, नाना चव्हाण, गणेश बडे यांच्या पथकाने केली.