| पनवेल | प्रतिनिधी |
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने लिंबूला मोठी मागणी निर्माण झाली असून, दर झपाट्याने वाढले आहेत. पनवेल कृषी उत्पन्न घाऊक बाजार समितीमध्ये दररोज होणारी लिंबांची आवक घटली आहे.
महाराष्ट्रातील श्रीगोंदा परिसरातून येणारा लिंबू यंदा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने व्यापाऱ्यांची अडचण वाढली आहे. या तुटवड्याची भरपाई करण्यासाठी मद्रास (तामिळनाडू) येथून लिंबू मागवले जात आहेत. मात्र, स्थानिक महाराष्ट्रातील लिंबाचे कव्हर पातळ व रसदार असते, तर मद्रास लिंबाचे कव्हर जाड असून त्यामधील रसाचे प्रमाण कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हॉटेल, सरबत विक्रेते व रसवंत्यांना अधिक लिंबू वापरावे लागत आहेत. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही लिंबू महाग झाले असून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर संपणारे लिंबू सरबत, लिंबू पाणी, सरबत व थंड पेयांचे दर वाढण्याची शक्यता आहे.







