| तळा | वार्ताहर |
थंडीची चाहूल लागताच घाटमाथ्यावरील मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन आपला मोर्चा कोकणाकडे वळवतात. या कालावधीत कोकणात या मेंढ्यांसाठीचा पालापाचोळा चारा जंगलात मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे मेंढ्यांचे चांगल्या प्रकारे पालन पोषण चांगले होत असते. त्यामुळे हे मेंढपाळ मजल दरमजल करत कोकणातील भागात येत असून, ते आता तळा तालुक्यात आले आहेत.
आजपर्यंत येणारे मेंढपाळ हे मोठ्या उत्साहात आनंदात कोकण भागात मेंढ्या घेऊन येत असतात. हे गरीब गरजू मेंढपाळ आपल्या मेंढ्या या तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतात काही ठराविक दिवस बसवितात. त्या मोबदल्यात मेंढपाळांना तांदूळ अथवा ठराविक रक्कम दिली जाते. अशाप्रकारे आठवडा दोन आठवडे एका-एका शेतात रात्री या मेंढ्या बसविण्यात येऊन त्या मेंढ्याचे मलमूत्र त्या शेतात पडून शेतीचा कस वाढून शेतीचे उत्पन्न वाढते व खताची मात्रा दिली नाही तरी चालते.