। पनवेल । वार्ताहर ।
सार्वजनिक गणेशोत्सवातून प्रबोधन आणि जनजागृतीसह निखळ भक्ती आणि अधर्माविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण करताना कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने यंदाच्या 14 व्या वर्षी ‘सुदर्शनधारी महागणपती’चा देखावा निर्माण केला आहे. मुंबई-लालबाग येथील प्रख्यात मूर्तिकार निखिल राजन खातू यांच्या कलेचा मूर्तिमंत आविष्कार पहायला मिळणार आहे. बुधवारी सकाळी पनवेलच्या महागणपतीचे मुंबईतील कार्यशाळेतून पनवेलकडे प्रस्थान झाले. पनवेलमध्ये येताच देवनगरीचा आनंद ओसंडून वाहत होता. वरुणराजानेही हजेरी लावत महागणपतीचे जोरदार स्वागत केले. यावेळी पनवेल बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली बाप्पाचे आगमन होताच रूपा कडू, प्रिया पाटील आदींनी बाप्पाचे औक्षण केले.
पनवेलचा महागणपती मुंबईतून पनवेलला आणणार्या पथकात कांतीलाल कडू, आनंद पाटील, मनोहर म्हात्रे, दीपक पाटील, किरण करावकर, हरेश पाटील, राकेश केणी, राजेंद्र पगारे, किरण पवार, रोहित शेलार, भूषण गोंधळी, आक्रम खान, शर्वाय कडू, प्रिन्स कोळी, तनिष्क पाटील आदींचा सहभाग होता. दरम्यान, यंदा ‘पनवेलचा महागणपती’साठी श्री कृष्णाचा महाल तयार करण्यात आला आहे. साडेसात हजार चौरस मिटरचा शामियाना उभारण्यात आला असून मुंबई तथा कोकणातील हा सर्वात मोठा भव्यदिव्य महाल असल्याचे बोलले जात आहे.