आफ्रिकन मुंबई सर्कसचे आगमन

विदेशी कलाकार करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

| माणगाव | प्रतिनिधी |

देशभरात गाजलेल्या व रसिक प्रेक्षकांचे मने जिंकलेल्या आफ्रिकन मुंबई सर्कसचे माणगाव शहरात प्रथमच नाणोरे फाटा येथे एचपी पेट्रोलपंप शेजारील भव्य मैदानात आगमन झाले आहे. या सर्कशीमध्ये विदेशी आफ्रिकन कलाकार आपली कला सादर करणार आहेत. ही सर्कस माणगावात दि. 8 मार्चपासून सुरु झाली असून दररोज सायंकाळी 5 व रात्री 8 असे 2 शो असून शनिवार व रविवार या 2 दिवशी खास शो म्हणून दुपारी 2 वा. तसेच, सायंकाळी 5 व रात्री 8 वाजता असे 3 वेळा शो राहणार आहेत. या सर्कशित आफ्रिकन खेळ, आफ्रिकन जिमन्यास्टिक खेळ, वरचा झुला, मौत का कुवा, मोटारसायकल जंप, लहान मुलांसाठी जोकर, चिंदाजीसारखा दिसणारा माणूस असे विविध खेळ प्रयोग आहेत. या सर्कशीबाबत अधिक माहितीसाठी 9162850086 व 9834425569 यावर संपर्क साधण्याचे आवाहन आफ्रिकन मुंबई सर्कस यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version