सोलापूरच्या अर्शिनची ‘अंडर-19’ संघात निवड

। मुंबई । वृत्तसंस्था ।

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने शनिवारी (दि.25) या संघाची घोषणा केली आहे. 8 ते 17 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा दुबई येथे होत आहे. 8 डिसेंबरला भारतीय संघाची लढत अफगाणिस्तान विरुद्ध, 10 डिसेंबरला पाकिस्तान विरुद्ध तर 12 डिसेंबरला नेपाळ विरुद्ध होणार आहे.

या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाकडून अर्शिनची तुफानी खेळी नक्कीच पाहायला मिळणार आहे. नुकतीच झालेल्या एमपीएल स्पर्धेत अर्शिनने धडाकेबाज शतक झळकावले होते. सोलापूरचे बालरोग तज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा अर्शिन कुलकर्णी सुपुत्र आहे.

भारताच्या अंडर-19 मध्ये निवड झाल्याने अतिशय आनंद झाला आहे. लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. वयाच्या 6 व्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरवात केली. सोलापुरात अंडर-14, 17, 19 खेळलो. पुढे महाराष्ट्र प्रीमियर लीग, वीनू माकंड ट्रॉफी, एन केपी साळवे ट्रॉफी, सय्यद अली ट्रॉफीमध्ये निवड होत गेली. आशिया कपसाठी भारताच्या संघात निवड झाली. माझे स्वप्न भारताच्या सीनियर संघात खेळायचे आहे.

अर्शिन कुलकर्णी, क्रिकेटपटू, भारत
Exit mobile version