। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बोरघर येथील शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका सहचिटणीस अरुण भगत यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी दिली आहे.
अरुण भगत हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या. त्यांच्या कृतीमुळे रामराज विभागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करुन अरुण भगत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यानुसार शेकापक्षातून भगत यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.