| अलिबाग | प्रतिनिधी |
भारताचे माजी लष्कर प्रमुख व अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची 39वी पुण्यतिथी अ.ता.शि.प्र. मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली. यावेळी महावीरचक्रपुरस्कार विजेते अरुणकुमार वैद्य यांच्या ऑपरेशन ब्लू स्टार संबंधी माहिती सभाध्यक्ष बळवंत वालेकर, कॅप्टन उमेश वाणी, ॲड. प्रसाद पाटील, योगेश मगर, सुकुमार भगत, संतोष तावडे व राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितली. तसेच, जनरल वैद्य यांचा स्मृतिदिन शासकीय इतमामाने साजरा होण्यासाठी हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंत्रालयात पाठविले गेले असून, ते विचाराधीन असल्याचे बळवंत वालेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमानिमित्त माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व रघूजीराजे आंग्रे यांच्याकडून आलेल्या शुभ संदेशांचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला द. ल. माळवी, सुकुमार भगत, वृषाली ठोसर, ॲड. अजय उपाध्ये, ॲड. प्रमोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






