। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा प्रज्ञा शोध अंतिम परिक्षा 16 एप्रिल रोजी पार पडली होती. त्यात अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी अर्वा चिखले हिने 300 पैकी 272 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. संपूर्ण जिल्ह्यातून या परीक्षेसाठी 3,800 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यामधून अंतिम परीक्षेद्वारे 105 गुणवंत विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. नुकताच रायगड जिल्हा परिषद आणि टीमच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांचे हस्ते गौरविण्यात आले आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, तालुका गटशिक्षणाधिकारी नितिश पाटील, नागाव केंद्र प्रमुख प्राची ठाकूर, नारंगी केंद्र प्रमुख दिलदार थळे, चौल केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, धोकवडे केंद्र प्रमुख उमेश ठाकूर, रत्नाकर पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उपशिक्षिका स्मिता चिखले, रविंद्र चिखले, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.





