। पनवेल । वार्ताहर ।
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आर्या सुधीर पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कोरोना काळात आलेला सकारात्मक अनुभव या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेस राज्यातून उदंड प्रतिसाद लाभला.विजयी स्पर्धकांचे पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून प्रथम तीन स्पर्धकांना समितीच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. आर्या पाटील हिस मिळालेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.