आर्यन खानची जेलमधून सुटका

मुंबई | प्रतिनिधी |
क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनची तब्बल 26 दिवसांनंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला होता.पण सुटका होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागला.आर्यन खानची सकाळी मुक्तता करण्यात आली.त्यानंतर तो मन्नतवर दाखल झाला.तिथे चाहत्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

Exit mobile version