अखेर हायकोर्टाकडुन आर्यन खानचा जामीन मंजूर

आर्यनला शहर सोडता येणार नाही; हायकोर्टाचे आदेश
। मुंबई । वृत्तसंस्था ।
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे. आर्यनची उद्या किंवा शनिवारपर्यंत कारागृहातून सुटका होईल, अशी माहिती आर्यनच्या वकिलांनी दिली परंतु आर्यनला शहर सोडता येणार नाही असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अनिल सिंग यांच्या सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला.

Exit mobile version