। मुंबई । प्रतिनिधी ।
शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.
आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. आर्यन खानच्या वकिलांनी ते उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतील. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत.