मुंबई । प्रतिनिधी ।
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान तसेच इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. येत्या 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देईल. दरम्यान, सुनावणी पूर्ण झालेली असली तरी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवल्यामुळे आर्यन खानचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच असणार आहे.