| कोल्हापूर । वार्ताहर ।
कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील हणमंतवाडी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामना झाला. या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहते असलेल्या बंडोपंत तिबिले यांनी आनंद व्यक्त केला. हणमंतवाडी बुधवारी (दि.27) रात्री दोन गटात रात्री आयपीएल सामन्यावरून हाणामारी झाली होती. रागाच्या भरात लाकडी फळी व काठीचा वापर करत सागर झांजगे व बळवंत झांजगे यांनी बंडोपंत बापू तिबिले यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले. तिबले यांच्या कानातून नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली. गंभीर जखमी झालेल्या बंडूपंत तिबिले यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिबिले यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र रविवारी (दि.31) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांससह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते होते. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना चांगलाच राग आला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हणत आनंद व्यक्त केला. यावेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी डोक्यात हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलिसही चक्रावून गेले.