मान्सून दाखल होताच मुरुडची बत्ती गुल

सलग दोन रात्री वीज गायब; नागरिक हैराण
। मुरूड । वार्ताहर ।
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सतत हुलकावणी देणार्‍या मान्सूनने अखेर कोकणामध्ये प्रवेश करत मान्सून दाखल झाल्याची हजेरी लावली. मुरूडमध्ये दि. 10 रोजी सायंकाळी पावसाने रिमझिम रिमझिम बरसत ढगांच्या गडगडाटासह सुरुवात केली. त्यामुळे बळीराजा सुखावला पण मुरुड तालुक्यातील संपूर्ण वीज प्रवाह 15 तासांहून अधिक काळ खंडित झाल्याने मुरुडची बत्ती गुल झाली. त्यामुळे नागरिकांना रात्रभर झोप न मिळाल्याने पुरते हैरान झाले होते. दुसर्‍या दिवशी पुन्हा रात्री वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे दोन रात्री वीजग्राहक हैराण झाले आहेत. गेले तीन महिने महावितरण दर मंगळवारी वीज प्रवाह खंडित करुन दुरुस्ती व देखभाल करीत होते ते कशासाठी असा प्रश्‍न वीजग्राहकांना पडला आहे.
या पहिल्याच पावसामध्ये मुरूड तालुक्याची संपूर्ण विज खंडित झाल्याने रात्रभर उकाड्याने व मच्छरने हैराण झालेल्या नागरिकांना झोपेचे खोबरे करावे लागेल. याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू होती. गेल्या तीन महिन्यांपासून विद्युत वाहिन्यावर वाढलेली झाडे, झुडपे तोडण्याच्या नावाखाली व दुरुस्ती करण्याकरता दर मंगळवारी वीज प्रवाह खंडित करण्यात येत होते मग पहिल्याच पावसामध्ये असे कसे झाले असा सवाल वीज ग्राहकांना पडला आहे.
मुरुड तालुक्याला पाबरा येथून वीज प्रवाह होत असल्याने सुरुवातीच्याच पावसात पाबरा येथे मुख्य वीज वाहिनीवर झाड पडल्याने उच्च दाब वीज वाहिनी तुटून मुरुड तालुक्याला होणारा वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर महावितरणचे कर्मचारी काम करीत होते. तब्बल 15 तासानंतर मुरुडचा वीज पुरवठा सुरू झाला. त्यावेळी मुरुडच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या दुसर्‍या रात्री पुन्हा वीज प्रवाह खंडित झाला आणि वीज ग्राहकांना आपल्या झोपेचे खोबरे करावे लागल

Exit mobile version