सिद्धेश्वर बुद्रुक कबड्डी स्पर्धेत आसनेवाडी अंतिम विजयी

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

श्री बापूजी क्रीडा मंडळ सिद्धेश्वर बुद्रुक येथे आदिवासी कातकरी समाज असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघांनी आपला प्रवेश निश्चित केला होता. स्पर्धेतील अंतिम लढत आसनेवाडी विरुद्ध दांडवाडी या दोन संघात झाली.आसनेवाडी संघातील खेळाडूने बहारदार खेळ करत अंतिम विजयी ठरला. या संघास रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक दांडवाडी या संघास रोख रक्कम 3 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक चिवे आणि चतुर्थ क्रमांक तळई या दोन्ही संघास प्रत्येकी 2 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई शुभम वाघमारे, उत्कृष्ट पकड राहुल पवार, पब्लिक हिरो पिंटू या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version