आसाराम बापूला पुन्हा जन्मठेप

| गांधीनगर | वृत्तसंस्था |

एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे त्याला यापूर्वीदेखील एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत सांगितलं होतं. सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असं पीडित मुलीने सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून त्याला 2018 मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

Exit mobile version