लखनौ| वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शेतकर्यांवर गाडी चालवणार्या व्यक्तीचा शोध सुरू होता. संबंधित गाडी गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा अशिष मिश्रा चालवत असल्याच्या बातम्या समोर आल्या. यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.