अशोक मोरेंचा सेवापूर्ती समारंभ

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुका सहाय्यक निबंधक अशोक मोरे हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने मुरुड तालुक्यातील पतसंस्थांतर्फे आयोजित सेवापूर्ती समारंभात तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने अशोक मोरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राजिम बँकेचे मुरुड शाखा व्यवस्थापक गणेश पुगावकर, जय श्रीराम पतसंस्थेचे व्हा. चेअरमन प्रा. मेघराज जाधव, सरव्यवस्थापक संजय ठाकूर, प्रमोद वाघमारे, परस्पर पतसंस्थेचे चेअरमन विजय पैर, महात्मा फुले पतसंस्थेचे व्यवस्थापक राकेश मसाल, मर्चंट क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक देवेंद्र मसाल, आदर्श पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सुप्रिया काळबेरे, परस्पर पतसंस्थेचे चेअरमन विजय पैर, वाल्मिकी पतसंस्थेचे संचालक कृष्णा अंबाजी, निलेश बिरवाडकर, दीपक फलेभाई, श्रीकाळ भैरव पतसंस्थेचे संचालक निवास रसाळ, दीपक मयेकर, प्रशांत कासेकर, कोर्लई ग्रामीण पतसंस्थेचे व्यवस्थापक वेगस, प्रभात ग्रामीणचे गोविंद, आर.आर. परदेशी तसेच पतसंस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Exit mobile version