| आगरदांडा | प्रतिनिधी |
सभासदांनी व ठेवीदारांनी दाखविलेल्या गाढ विश्वासावर ही संस्था भक्कम उभी आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असतात, यामधूनच सामाजिक बांधिलकी जपून संस्थेची प्रगती करता येते, असे प्रतिपादन मुरुड महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अजित गुरव यांनी केले. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा माळी समाज हॉल येथे घेण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपाध्यक्ष अनघा चौलकर, संस्थापक मनोहर गुरव, सदस्या सायली गुजाळ, सदस्य महेंद्र पाटील, आदेश दांडेकर, संदेश दांडेकर, अमित कवळे, राहुल वर्तक,संदेश (पप्पू) भगत,उमेश अपराध, तज्ञ संचालक मंगेश पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. अजित चौगले, व्यवस्थापक राकेश मसाल, कॅशिअर योगेश अपराध, विशाल विरुकुड, अशोक विरकुड, चंद्रकांत अपराध, महेश कारभारी, जगदिश पाटील, प्रकाश विरकुड, नंदकुमार भगत, राजेंद्र भायदे, संदिप पाटील,श्रध्दा अपराध तसेच सर्व कर्मचारी व पिग्मी कर्मचारी उपस्थित होते.
सभेची सुरुवात अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्ज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी जयकांत भायदे यांच्या मालकीच्या चार म्हशी व गायीला विद्युत तारेचा शॉक लागल्याने त्याचा त्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगात संस्थेने सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांना त्वरित रक्कम रुपये 15,000/- चा चेक अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुरुड व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील व महाड को ऑप अर्बन बँकेच्या शाखाधिकारी श्रद्धा चंद्रकांत अपराध तसेच मुरुड बाजारपेठेत आपली सेवा बजावताना हरवलेली रुपये 1 लाख परत करण्याऱ्या तीन होमगार्ड महिलांचा सत्कार यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन सायली गुजाळ यांनी, तर आभार प्रदर्शन अनघा चौलकर यांनी केले.