। पनवेल । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे खारघर सरचिटणीस कै. अशोक (बापू) नारायण मोरे यांचे 17 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले होते. आज (दि.25) सकाळी दहा वाजता उत्कर्ष हॉल खारघर या ठिकाणी त्यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे सातवे आणि बारावे बुधवारी (दि.28) एकाच दिवशी त्यांच्या घरी करण्यात येणार आहेत.
यावेळी आपल्या शोकयुक्त भाषणात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले बापूंची आठवण म्हणून खारघर पक्ष कार्यालयामध्ये लवकरच रुग्णवाहिकेची सोय तसेच खारघर मधील दोन पी.एच.सी. सेंटरमध्ये ऑटोमॅटिक ईसीजी मशीन लावण्यात येतील. पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी सांगितले बापूंच्या जाण्याने खारघर शेकापचे नुकसान झाले आहे. बापू प्रत्येक कार्यक्रमात घोषणा देऊन कार्यकर्त्यांची मरगळ दूर करत असत. तसेच, नारायण घरत, गणेश कडू, प्रकाश म्हात्रे, लीना गरड, मधुकर पाटील, जयेश कांबळे, अजित अडसुळे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खारघर मधील नरेश पाटील यांनी केले.